Psalms 8

मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.

1हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतो, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
2तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
बाळांच्या आणि तांन्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.

3तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या

आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
4तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?
किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
5तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस.
आणि गौरवाने व आदराने तू त्याला मुकुट घातला आहे.

6तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे त्यांना अधिपत्य तू दिलेस.

तू सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आहेस.
7सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
8आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे
जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

हे परमेश्वर, आमच्या देवा,

सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
9

Copyright information for MarULB