Psalms 108

1हे देवा, माझे मन स्थिर आहे;
मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
2हे सतार आणि वीणांनो, तुम्ही जागृत व्हा.
मी पहाटेला जागे करीन.

3हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन;

मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
4कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे;
आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.

5हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे.

आणि तुझा महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
6म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचवे,
तुझ्या उजव्या हाताने आम्हाला वाचव आणि मला उत्तर दे.

7देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन;

मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
8गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे.
एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे.
यहूदा माझा राजदंड आहे.

9मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले माझे पादत्राण फेकीन.

मी पलिष्टीविषयी मी विजयाने आरोळी करीन.”
10तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल?
मला अदोमात कोण नेईल?

11हे देवा, तू आम्हाला नाकारले नाही का?

तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
12आमच्या शत्रूविरूद्ध आम्हाला मदत दे,
कारण माणसाची मदत निष्फळ आहे.
देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ;
तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.
13

Copyright information for MarULB