1 Chronicles 7
इस्साखार
1इस्साखारचे पुत्र:तोला, पुआह, याशूब व शिम्रोन; एकूण चार पुत्र.
2तोलाचे पुत्र:
उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.
3उज्जी पुत्र:
इज्राह.
इज्राहचा पुत्र:
मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते. 4त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती.
5इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.
बिन्यामीन
6बिन्यामीनचे तीन पुत्र:बेला, बेकेर व यदिएल.
7बेलाचे पुत्र:
एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.
8बेकेराचे पुत्र:
जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ. 9ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.
10यदिएलाचा पुत्र:
बिल्हान.
बिल्हानाचे पुत्र:
यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर. 11हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
12ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
नफताली
13नफतालीचे पुत्र:यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम ▼
▼इतर मूळ प्रतींनुसार शल्लूम
. ही बिल्हाची संतती.मनश्शेह
14मनश्शेहचे वंशज:त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला. 15माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या. 16माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
17ऊलामाचा पुत्र:
बदान.
हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.
18त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.
19शेमीदाचे पुत्र:
अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम.
एफ्राईम
20एफ्राईमचे वंशज:एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद,
त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह,
त्याचा पुत्र तहथ, 21त्याचा पुत्र जाबाद,
त्याचा पुत्र शुथेलह.
(आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते. 22यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले. 23तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह ▼
▼म्हणजे शोकांतिका
असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते. 24त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)25त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ,
रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन,
26त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद,
त्याचा पुत्र एलीशामा, 27त्याचा पुत्र नून
व त्याचा पुत्र यहोशुआ.
28त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती. 29त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.
आशेर
30आशेराचे पुत्र:इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.
31बरीयाहचे पुत्र:
हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.
32हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.
33यफलेटाचे पुत्र:
पासख, बिह्माल व अश्वाथ.
ही यफलेटाची संतती होती. 34शोमेराचे पुत्र:
अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम.
35शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र:
सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
36सोफहाचे पुत्र:
सूहा, हर्नेफेर, शूआल, बेरी, इम्राह, 37बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान ▼
▼दुसरे नाव येथेर
व बैरा.38येथेराचे पुत्र:
यफुन्नेह, पिस्पाह व अरा.
39उल्लाचे पुत्र:
आरह, हन्निएल, रिस्याह.
40आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.
Copyright information for
MarMRCV