Deuteronomy 5:16-20
16याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.17तुम्ही खून करू नका.
18तुम्ही व्यभिचार करू नका.
19तुम्ही चोरी करू नका.
20तुमच्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.
Copyright information for
MarMRCV