‏ Exodus 30:13-17

13प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल
शेकेल अंदाजे 5.8 ग्रॅ.
द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे.
14जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे. 15जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये. 16इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

धुण्याचे गंगाळ

17मग याहवेह मोशेला म्हणाले,
Copyright information for MarMRCV