Ezekiel 40
मंदिराच्या क्षेत्राची पुनर्स्थापना
1आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले. 2परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या. 3याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता. 4तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”बाहेरील अंगणाचे पूर्वेकडील द्वार
5मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात ▼▼किंवा 3.2 मीटर
लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती. 6मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता. 7पहारेकर्यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात ▼▼किंवा 2.7 मीटर
अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता. 8त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले; 9ते आठ हात ▼▼किंवा 4.2 मीटर
होते आणि त्याचे खांब दोन हात ▼▼किंवा 1 मीटर
होते. वेशीची देवडी मंदिरासमोर होती. 10पूर्वेकडील द्वाराच्या आतून प्रत्येक बाजूला तीन चौक्या होत्या; त्या तीनही एकाच मापाच्या होत्या आणि प्रत्येक बाजूच्या भिंतींचे माप सुद्धा सारखेच होते. 11मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती. ▼▼किंवा 5.3 रुंदी व 6.9 मीटर लांबी
12प्रत्येक चौकीच्या समोर एक हात उंच भिंत होती आणि चौक्या दोन्ही बाजूंनी सहा हात होत्या. 13मग त्याने एका चौकीच्या भिंतीच्या मागच्या बाजूच्या वरपासून दुसर्या भिंतीच्या वरपर्यंतचे वेशीचे माप घेतले; त्यातील अंतर एका कठड्यापासून दुसर्यापर्यंत पंचवीस हात ▼▼किंवा तेरा मीटर
मापले. 14त्याने वेशीच्या आतील बाजूने भिंतींचे सर्वबाजूंनी माप घेतले ते साठ हात ▼▼किंवा 32 मीटर
होते. हे माप अंगणासमोरील देवडीपर्यंत होते. 15वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते. ▼▼किंवा 27 मीटर
16वेशीच्या आतील चौक्या आणि भिंतीच्या चहूबाजूंना झरोके असलेले कठडे होते, तसेच देवडींनाही आतील बाजूने झरोके होते. भिंती खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून सजविल्या होते. बाहेरील अंगण
17मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या. 18त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती. 19मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात ▼▼किंवा 53 मीटर
होते. उत्तरेकडील द्वार
20मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली. 21त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते. 22त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती. 23जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले.दक्षिणेकडील द्वार
24मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते. 25त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 26त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती. 27आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.आतील अंगणाचे द्वार
28त्यानंतर त्या मनुष्याने मला दक्षिणेकडील द्वारातून आतील अंगणात आणले आणि त्याने दक्षिणेकडील द्वार मापले; इतर द्वारांप्रमाणेच त्याचेही माप होते. 29त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती. 30(आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.) 31त्याची देवडी बाहेरील अंगणासमोर होती; खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून त्याच्या खांबांना सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्या होत्या. 32त्यानंतर त्याने मला पूर्वेच्या बाजूने आतील अंगणात आणले, आणि त्याने वेशीचे माप घेतले; इतर वेशींप्रमाणेच हिचेही माप भरले. 33त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती. 34त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्या होत्या. 35नंतर त्याने मला उत्तरेच्या द्वाराकडे आणले व त्याचे माप घेतले. इतरांप्रमाणेच त्याचेही माप भरले. 36त्याप्रमाणेच त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्या होत्या, आणि चहूकडून त्याला झरोके होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते. 37त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्या होत्या.अर्पणे तयारीच्या खोल्या
38प्रत्येक आतील वेशीच्या देवडीकडे द्वार असलेली खोली होती, जिथे होमार्पणे धुतली जात असत. 39वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे ▼▼किंवा शुद्धार्पणे
व दोषार्पणे वधली जात असत. 40वेशीच्या देवडीच्या बाहेरील भिंतीजवळ, उत्तरेच्या वेशीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मेज होते आणि पायर्यांच्या दुसर्या बाजूने दोन मेज होते. 41म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत. 42होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते. ▼▼किंवा 80 सें.मी. लांबी व रुंदी आणि 53 सें.मी. उंची
त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती. 43भिंतीच्या चहूकडून प्रत्येकी चार बोटे ▼▼सुमारे 9 सें.मी.
असे दुहेरी टोके असलेले आकडे अडकविले होते. ते मेज अर्पणाच्या मांसासाठी होते. याजकांसाठी खोल्या
44आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती. 45तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली खोली मंदिराचे राखण करणार्या याजकांसाठी आहे 46आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.” 47मग त्याने अंगणाचे माप घेतले: ते चौरस असून दोन्ही बाजूंनी शंभर हात लांब व शंभर हात रुंद होते आणि वेदी मंदिरासमोर होती.नवीन मंदिर
48त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात ▼▼किंवा 7.4 मीटर
होती आणि त्याच्या भिंती ▼▼किंवा प्रवेशद्वार
दोन्ही बाजूंनी तीन हात ▼▼किंवा 1.6 मीटर
रुंद होत्या. 49देवडी वीस हात ▼▼किंवा 11 मीटर
रुंद होती, आणि मागून पुढून बारा हात ▼▼किंवा 6.4 मीटर
होती. त्यावर जाण्यासाठी पुष्कळ पायर्या ▼▼मूळ प्रतींनुसार 10 पायर्या
होत्या आणि खांबांच्या प्रत्येक बाजूला खांब होते.
Copyright information for
MarMRCV