Isaiah 53:7-8
7त्याला छळले व जाचले,तरीही त्याने आपले मुख उघडले नाही;
वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले,
आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते,
तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
8अत्याचार ▼
▼किंवा कैद करून
करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले.तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला?
कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला;
माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.
Copyright information for
MarMRCV