Joel 2:28-32
याहवेहचा दिवस
28“आणि त्यानंतर,मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन.
तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील,
व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील,
तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
29माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
30आकाशात व पृथ्वीवर,
रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी
विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
31याहवेहचा महान व भयंकर दिवस
येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व
चंद्र रक्तमय होईल.
32आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने
त्यांचा धावा करेल तोच वाचेल;
कारण याहवेहने म्हटले आहे
सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये
व जे उरलेले असतील ते वाचतील
आणि ज्यांना याहवेहने बोलाविले
ते सुद्धा तारण पावतील.
Copyright information for
MarMRCV