‏ Psalms 100

एक स्तोत्र. उपकारस्तुतीचे गीत

1हे समस्त पृथ्वी, याहवेहसाठी जयघोष कर.
2आनंदाने याहवेहची आराधना करा;
हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
3याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या.
ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत;
किंवा आम्ही त्यांच्या मालकीचे आहोत

आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.

4उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा;
स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा;
त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
5कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे;
त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
Copyright information for MarMRCV