Psalms 120
प्रवाशांचे आराधना गीत.
1संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली,आणि त्यांनी ती ऐकली.
2हे याहवेह,
असत्य बोलणार्या ओठांपासून
व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
3अगे कपटी जिभे,
ते तुला काय करतील,
आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
4ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी,
केरसुणीच्या लाकडांच्या निखार्यांनी दंड करतील.
5धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले,
वा केदार येथे माझा डेरा घातला!
6जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात
मी बराच काळ घालविला आहे.
7मी तर शांतताप्रिय आहे;
पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.
Copyright information for
MarMRCV