Psalms 3
दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला.
1याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे!कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!
2पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात,
“परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला ▼
▼सेला या इब्री शब्दाचा अर्थ कदाचित गीत गाताना मध्ये थोडे थांबणे असा आहे.
3परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात.
माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.
4मी याहवेहचा धावा करतो,
आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला
5मी पहुडतो आणि झोप घेतो;
मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.
6असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील,
तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.
7याहवेह, उठा!
हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा!
माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा;
त्या दुष्टांचे दात पाडून टाका.
8कारण सुटका याहवेहपासूनच आहे.
तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला
Copyright information for
MarMRCV