Psalms 61
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझा धावा ऐका,माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
2दिगंतापासून मी तुमचा धावा करतो
माझे हृदय व्याकूळ झाले असताना;
तुम्हीच मला उंच खडकावर न्या.
3कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान,
शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.
4तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास
आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला
5कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे
आणि तुमच्या नावाचे भय धरणार्यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.
6तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा;
ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.
7तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो.
तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.
8म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन
आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.
Copyright information for
MarMRCV