‏ Psalms 65

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत.

1हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित
अपेक्षित किंवा योग्य आहे
आहे;
तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.
2तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता,
म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.
3आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली,
तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा
किंवा प्रायश्चित केले
केली.
4तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी
तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य!
आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या
उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.

5तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता,
परमेश्वर, आमचे तारणकर्ता,
पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत,
तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात.
6आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना
त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे.
7तुम्ही महासागराच्या खवळलेल्या
लाटांना शांत करता
आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता.
8संपूर्ण पृथ्वी तुमच्या महाकृत्याने विस्मित होते;
सूर्योदय आणि सूर्यास्त ही
आनंदाने जयघोष करीत आहेत.

9तुम्ही या भूमीची काळजी घेता
व ती सिंचनासाठी देता.
आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे
म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत,
कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे.
10तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता;
पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता.
11तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता
आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत.
12राने हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादून टाकता;
टेकड्या आनंदाची वस्त्र परिधान करतात.
13हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात
आणि दर्‍यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते;
ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते.
Copyright information for MarMRCV