‏ Psalms 67

संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. एक स्तोत्र. एक गीत.

1परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो
आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला
2यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे,
तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे.

3हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत,
सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
4राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत,
कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल
आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला
5हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत;
सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.

6कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे;
परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात.
7परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत,
जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.
Copyright information for MarMRCV