Psalms 95:7-11
7कारण ते आपले परमेश्वर आहेत.आपण त्यांच्या कुरणातील प्रजा
आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.
आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!
8“मरीबाह ▼
▼मरीबाह अर्थात् भांडण
येथे असताना केली तशी,जसे मस्सा ▼
▼मस्सा परीक्षा
च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.9माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही,
तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
10चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो;
मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत
आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’
11मग मी रागाने शपथ घेतली की,
‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”
Copyright information for
MarMRCV