‏ Psalms 126

प्रवाशांचे आराधना गीत.

1जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले
किंवा जेव्हा इस्राएलला बंदिवासातून परत आणले
,
तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
2आमचे मुख हास्याने भरले होते
आणि किती हर्षगीते आम्ही गाईली!
तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली:
“पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
3याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत,
आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.

4हे याहवेह, नेगेव नदीसारखी,
आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या
म्हणजे आमच्या बंदिवासांना परत आणा.
.
5जे अश्रूंनी पेरणी करतात,
ते आनंदाने कापणी करतील.
6जे रडत पेरणीसाठी
बी घेऊन जातात,
ते आपल्या पेंढ्या घेऊन,
आनंदाने हर्षगीते गात परत येतील.
Copyright information for MarMRCV