Psalms 134
प्रवाशांचे आराधना गीत.
1अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.
तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
2पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा
आणि याहवेहचे स्तवन करा.
3स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह,
तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.