‏ Psalms 15

दावीदाचे स्तोत्र.

1याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल?
तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

2ज्याचे चालणे निर्दोष आहे,
जो धार्मिकतेचे आचरण करतो,
जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;
3जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही,
जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही,
आणि इतरांना काळिमा लावत नाही;
4जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो,
याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो,
आणि जो स्वतःचे नुकसान होत असले
तरी दिलेले वचन पाळतो;
5जो व्याज न आकारता पैसे उसने देतो;
जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही,

जो कोणी या गोष्टी करतो
तो कधीही ढळणार नाही.
Copyright information for MarMRCV