‏ Psalms 150

1याहवेहचे स्तवन करा.

त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा;
त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;
2त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा;
त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;
3कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा;
सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;
4डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा;
तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.
5खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा;
झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

6प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो.

याहवेहचे स्तवन करा.
Copyright information for MarMRCV