Psalms 23
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.2ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात,
ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात.
3ते माझा जीव ताजातवाना करतात.
ते आपल्या नावासाठी
मला नीतिमार्गाने चालवितात.
4मृत्युछायेच्या दरीतूनही ▼
▼किंवा अंधार्या दरीतून
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
5तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढता;
तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता;
माझा प्याला भरभरून वाहत आहे.
6खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती
मजबरोबर आयुष्यभर असतील,
आणि मी याहवेहच्या,
घरात सदासर्वदा राहीन.
Copyright information for
MarMRCV