Psalms 47
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
1अहो सर्व लोकांनो, टाळ्या वाजवा;उत्साहपूर्ण शब्दांनी परमेश्वराचा जयजयकार करा.
2कारण सर्वोच्च याहवेह भयप्रद आहेत;
ते अखिल पृथ्वीचे सार्वभौम राजा आहेत.
3त्यांनीच लोकांना आमच्या सत्तेखाली
आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणले.
4ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात,
हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला
5प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत,
तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत.
6परमेश्वराची स्तुती गा, स्तुती गा;
आमच्या राजाची स्तुती गा, स्तुती गा.
7कारण परमेश्वर अखिल पृथ्वीचे राजाधिराज आहेत;
त्यांच्याप्रीत्यर्थ स्तुतिस्तोत्रे गा.
8परमेश्वर सर्व राष्ट्रांवर सत्ता गाजवितात;
परमेश्वर आपल्या पवित्र सिंहासनावर विराजमान आहेत.
9जगातील लोकांचे अधिपती,
अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत;
पृथ्वीवरील राजे ▼
▼किंवा ढाली
वास्तविक परमेश्वराचेच आहेत,ते अत्यंत थोर आहेत.
Copyright information for
MarMRCV