‏ Isaiah 42:1-4

याहवेहचा सेवक

1“पाहा, हा माझा सेवक! याला माझे पाठबळ आहे!
माझा निवडलेला, ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;
माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन.
राष्ट्रांना तो न्याय आणेल.
2तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही.
किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही.
3चेपलेला बोरू तो मोडणार नाही.
मिणमिणती वात तो विझविणार नाही.
तो विश्वासूपणाने न्यायदान करेल;
4पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत,
तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही
त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”
Copyright information for MarMRCV