Isaiah 66:1-2
न्याय आणि आशा
1याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहेआणि पृथ्वी माझे पादासन आहे.
तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे?
माझे विश्रांतिस्थान कुठे असणार?
2माझ्या हाताने हे सर्व घडवले
आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?”
अशी याहवेह घोषणा करतात.
“ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात:
जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत,
आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.
Copyright information for
MarMRCV