Numbers 9:15-17
निवासमंडपावरील मेघ
15ज्या दिवशी निवासमंडप, कराराच्या नियमाचा मंडप उभारण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याला झाकून टाकले. संध्याकाळपासून सकाळपर्यंत निवासमंडपावरील मेघ अग्नीसारखे दिसू लागले. 16आणि ते तसेच चालू राहिले; मेघांनी त्याला झाकले आणि रात्री ते अग्नीसारखे दिसू लागले. 17जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत.
Copyright information for
MarMRCV