‏ Psalms 14:1-3

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

1मूर्ख
किंवा अनैतिक
आपल्या मनात म्हणतो,
“परमेश्वर नाही.”
ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत,
सत्कर्म करणारा कोणी नाही.

2मानवांमध्ये कोणी समंजस आहे का?
परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का?
हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून
खाली पाहतात.
3प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;
सत्कर्म करणारा कोणीच नाही,
एकही नाही.
Copyright information for MarMRCV